

श्रीवाल्मीकिरामायणाला आदिकाव्याचा दर्जा आहे.
रामकथा भारतभर पसरून अनेक भाषांमध्ये रामायण लिहिले गेले आहे;
परंतु फक्त मूळ वाल्मीकिरामायण समोर ठेवून त्यावर प्रवचने होणे हे मराठीत तसे अपूर्वच. श्री.
माधवराव चितळे यांनी अशा या 88 प्रवचनांचा प्रपंच पाच वर्षांत पूर्ण केला.
त्याचेच हे संपादित रूप
वाल्मीकींची रचना साहित्य म्हणून सुंदर आहेच;