

जगात आजतागायत होऊन गेलेल्या सर्वांत महान व्यक्तींमध्ये गणना केल्या जाणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांनी त्यांच्या आयुष्याची कहाणी प्रस्तुत पुस्तकात सांगितली आहे. त्यात सुरुवातीला त्यांनी गुजरातयेतील पोरबंदर व राजकोट इथलं त्यांचं बालपण, त्यांच्या शाळेतला काळ, लहान वयात झालेलं लग्न, आणि चोरी करताना, खोटं बोलताना, सिगरेट ओढताना शिकायला मिळालेले धडे, तसंच आईवडिलांविषयीची त्यांची अढळ निष्ठा याबद्दल लिहिलं आहे. त्यानंतर ते आधी इंग्लंडला आणि नंतर दक्षिण आफ्रिकेला झालेल्या