20% Discount All New Customers get register

Home

Description

समाजातील लंपट युवा-बाया-बापूंना मोठी प्रतिष्ठा आणि अमाप पैसा मिळाला की त्यांचं अंतिम ध्येय असतं ते विविध महिलांना उपभोगणे, पण अशा डोंगी युवा-बायांना ओळखण्यात अनेकांचा गोंधळ होतो. हे युवा-बापू महिला भक्तांना कसे भजनी लावतात? प्रा. श्याम मानव त्यांना कोणती प्रलोभने देतात ? तरुण महिला अशा वयस्कर वायांच्या प्रलोभनांना का बळी पडतात? हे ढोंगी युवा-बाबा समाजातील सर्वच घटकातील स्त्रियांचे कशाप्रकारे शारीरिक-आर्थिक शोषण करतात? कसे महिलांना जाळ्यात ओढतात ? अशा बुवाबाबांना कसे ओळखायचे? त्यांना उघडे कसे पाडायचे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे हे पुस्तक आहे. अनेकांच्या जीवनात त्यांच्यासमोर अशा काही घटना घडल्या असल्याने त्या खऱ्या की खोट्या या व्दिधा मनस्थितीत असे लोक असतात. प्रा. श्याम मानवांना शुकदास, सत्यदेव, व्यंकटनाथ, हजरतबाबा करामत अली, स्वामी विद्वानंद, गिरीपुंजे, कृपालूबाबा, सुंदरदास अशा अनेक नावाजलेल्या बाबा-महाराजांचे भांडाफोड करतांना आलेले अनुभव समजून घेण्यासाठी आणि आसाराम-रामरहिम पर्यंत सर्व बाबांच्या लोकांना फसविण्याच्या पध्दती प्रत्यक्ष उदाहरणर्णासह जाणून घेण्यासाठी महत्वाचा ग्रंथ.. कारण हे काल्पनिक लिखाण नाही तर लेखकाने स्वतःअनुभवलेल्या घटना आहेत. या घटनांमधील अनेक पात्रे तर आपल्याही ओळखीची असतील

related this items

Product Reviews

No reviews available for this product.

VIDYA BOOKS