20% Discount All New Customers get register


भारतीय तत्त्वज्ञानाची बैठक समजावून देणारी देवदत्त पट्टनायक यांची ‘Seven Secrets of Shiva’ आणि ‘Seven Secrets of Vishnu’ ही दोन पुस्तकं आता ‘शिवाची सात रहस्ये’ आणि ‘विष्णूची सात रहस्ये’ या नावांनी मराठीत उपलब्ध आहेत. भारतीय तत्त्वज्ञानानुसार सृष्टी निर्माणकर्ता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता शिव अशी परमेश्वराची रूपे मानली जातात. या तीनही संकल्पना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणारी ही दोन पुस्तके आहेत. ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही, माया सृष्टी म्हणजे काय, विष्णूच्या अनेक अवतरांमागची कारणे, शिव, शंकर, रुद्र, भैरव, अशा शिवाच्या रूपांमधला फरक काय, शिवलिंग ह्या संकल्पनेचा अर्थ काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकांमध्ये मिळतात.