

अनेक झेन कथा आणि प्रश्नांना दिलेली उत्तरे यांच्या माध्यमातून ओशो, अहंकाराची ओळख करून देण्यासाठी, स्व म्हणजे जे काही आहे ते तिथंच आहे, या कल्पनेवर आघात करण्यासाठी विनोदाचा वापर करतात. ‘एक अनपेक्षित बदल, एक अकल्पित वज्राघात, एक असातत्य’ आणि मनाचं बंधन गळून पडतं. या पुस्तकात वेगवान, सोप्या प्रक्रिया आहेत, ज्यांचा रोजच्या सामान्य जगण्यात जाणीव-जागृती होण्यासाठी उपयोग होऊ शकतो.