20% Discount All New Customers get register


Prasarmadhyame : Bhumika Aani Kayde Vidula Mhaisekar- Chavhan
प्रसारमाध्यमे भूमिका आणि कायदे
विदुला म्हैसेकर-चव्हाण
‘प्रसारमाध्यमे : भूमिका आणि कायदे’ हा विषय जनसंवाद आणि पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना ज्ञात असणे अपेक्षित आणि आवश्यक आहे. भारतीय कायद्यांचा उगम, भारतीय राज्यघटना, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका आणि राज्यघटनेने बहाल केलेले भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यासोबतच भारतीय निवडणूक प्रणाली हे सर्व फक्त पत्रकारांना आणि विद्यार्थ्यांनाच नाही, तर प्रत्येक भारतीयाला माहिती असणे आवश्यक आहे. भारतीय प्रेस परिषदेची आचारसंहिता आणि अखिल भारतीय वृत्तपत्र संपादक परिषदेची आचारसंहिता (AINEC Code) यादेखील पत्रकारांना फक्त माहिती असणे नव्हे, तर त्यांचे अनुसरण करणे अपेक्षित आहे. कार्यक्षेत्रात रुजू असलेल्या पत्रकार व्यक्तीसाठी किमान श्रमिक पत्रकार आणि पत्रकारेतर कामगार अधिनियम १९५५, न्यायालयीन अवमान कायदा, बदनामी कायदा, भारतीय कॉपीराईट अधिनियम १९५७, वृत्तपत्रे आणि मुद्रणालये व पुस्तके नोंदणी अधिनियम १८६७, संसदीय विशेषाधिकार, शासकीय गुपिते अधिनियम १९२३ इ. कायद्यांबाबत ज्ञान असणे आवश्यक आहे. मीडिया पक्षपाताच्या अनेकानेक घटना उघडकीस येत असताना आणि पेड न्यूज व स्टिंग ऑपरेशनकडे माध्यमांचा कल वाढला असताना माहितीचा अधिकार आणि गोपनीयतेचा अधिकार यात समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आताच्या संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सायबर कायद्याबाबत आणि नव्या माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ बाबत सविस्तर माहिती असणे अत्यावश्यक आहे. ‘प्रसारमाध्यमे भूमिका आणि कायदे’ हे पुस्तक फक्त विद्यार्थ्यांसाठी नसून पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींसाठी आहे.